व्हेज मंचुरियन पाककृती मराठीमध्ये -
साहित्य :
- दीड वाटी किसलेले किंवा बारीक चिरलेले कोबी
- १/२ वाटी गाजर किसलेले
- १ लहान कांदा बारीक चिरलेला
- १ चमचा मक्याचे पीठ (कॉर्नफ्लोअर)
- २ चमचे मैदा
- १/२ चमचा लसुण पेस्ट
- २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- चवीनुसार मीठ
- तेल तळण्यासाठी
- ३-४ मिरच्या
- ५-६ लसूण पाकळ्या
- १ चमचा टोमॅटो सॉस
- १/२ चमचा सोया सॉस
- १/२ चमचा चिली सॉस (आवडीनुसार)
- १/२ चमचा आले पेस्ट
- १/२ चमचा मक्याचे पीठ (कॉर्नफ्लोअर)
- १/२ वाटी पाणी
- १ चमचा तेल
- चिमूटभर साखर
- चवीनुसार मीठ
- बारीक चिरलेला पातीचा कांदा
- बारीक चिरलेली कोबी
कृती :
- किसलेला किंवा बारिक चिरलेला कोबी, गाजर, कांदा, कॉर्नफ्लोअर, मैदा, लसुण पेस्ट, मिरची आणि चवीनुसार मीठ एकत्र करावे.
- मिश्रणामध्ये असणार्या भाज्यांना पाणी सुटते, त्यामूळे मिश्रणात पाणी घालू नये.
- मिश्रणाचे लहान - लहान गोळे करावे. कढईत तेल गरम करून त्यात गोळे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावेत. गोळे मध्यम आचेवर तळून घ्यावेत.
- आता ग्रेव्हीसाठी एका कढईत तेल गरम करून घ्यावे. त्यात लसुण, मिरची, सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस आणि आले पेस्ट घालून मिश्रण मोठ्या आचेवर शिजवून घ्यावेत.
- 1 वाटी पाण्यात 1/2 चमचा कॉर्नफ्लोअर एकत्र करून वरील मिश्रणात घालावे. मिश्रण उकळले की त्यात साखर, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालावे. आणि ग्रेव्ही 2 मिनीट मध्यम आचेवर शिजवून घ्यावे.
- आता तयार केलेले मंचुरियन गोळे ग्रेव्हीमधे घालून 2-3 मिनीट शिजवावे.
- सेव्हिंग प्लेट मधे तयार गरम गरम मंचुरियन गोळे घेऊन त्यावर ग्रेव्ही, बारीक चिरलेला पातीचा कांदा आणि बारीक चिरलेली कोबी घालावी.
0 टिप्पण्या