चटपटीत क्रिस्पी कॉर्न -
क्रिस्पी कॉर्न | Crispy Corn recipe in marathi |
साहित्य :
- २ कप मका
- ४ चमचे मक्याचे पीठ
- १/२ चमचा जिरे पावडर
- १/२ चमचा चाट मसाला
- १/२ चमचा लाल तिखट
- १ चमचा कांदयाची पात बारीक चिरलेली
- अर्धा लिंबू
- तेल
- पाणी
- चवीपुरते मीठ
कृती :
- एका भांडयात मका, मीठ आणि पाणी घेऊन ५-६ मिनिटे उकडुन घ्यावे.
- मका उकडल्यास त्यामधले सगळे पाणी निथळुन सुती कपड्यावर ठेवुन कोरडे करावे.
- उकडलेल्या मकामध्ये मक्याचे पीठ आणि मीठ घालुन मिसळुन घ्यावे.
- एका कढईमधे तेल गरम करावे. तेल गरम झाल्यास मक्याचे मिश्रण तळावे.
- आता एका भांड्यात तळलेले मका, जिरे पावडर, चाट मसाला, लाल तिखट, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कांदयाची पात आणि चवीपुरते मीठ टाकून सगळे एकजीव करून घ्यावे.
0 टिप्पण्या