खानदेशी चमचमीत वांग्याचे भरीत -
खानदेशी भरीत | khandeshi bharit recipe |
साहित्य :
- ४-५ वांगे
- कांदा पात
- १/२ कप खिसलेले खोबरे
- ४-५ चमचे तीळ
- १ चमचा लसूण पेस्ट
- १ चमचा काळा मसाला
- १/२ चमचा हळद
- १/२ चमचे जिरे
- १/२ चमचा मोहरी
- १/२ कप शेंगदाण्याचे कुट (पर्यायी )
- चवीपुरते मीठ
- तेल
- कोथिंबीर
कृती :
- कांद्याची पात बारीक चिरून घ्यावे.
- वांगे गॅस वर भाजुन घ्यावे. वांगे भाजले की त्याचे वरचे टरफल काढून वांगे क्रश करावे.
- आता एका कढईत तेल घ्यावे. तेल गरम झाल्यास त्यात मोहरी, जिरे, कांद्याची पात,लसूण पेस्ट टाकुन चांगले तळून घ्यावे.
- नंतर त्यात खिसलेले खोबरे टाकून खोबरे लालसर होईपर्यंत तळून घ्यावे. आता त्यात तीळ, हळद , काळा मसाला आणि चवीपुरते मीठ घालावे.
- आता त्यात क्रश केलेले वांगे, शेंगदाण्याचे कुट आणि कोथिंबीर टाकून चांगले मिसळून घ्यावे.
- खानदेशी वांग्याचे भरीत तयार !!!
0 टिप्पण्या